आळंदी शहरातील पथविक्रेत्यांना न्याय द्या अन्यथा नगरपरिषदेसमोर बोंब मारो आंदोलन करू

Spread the love

अक्षराज : प्रतिनिधी
दि.२३, आळंदी (पुणे) :
संघर्ष नायक भगवानराव वैराट यांच्या मार्गदर्शनातून महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल संलग्न
महाराष्ट्र राज्य पथारी सुरक्षा दल या संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी आळंदी नगरपरिषद यांची भेट घेऊन चर्चा करून गुरुवार दि.२१ रोजी निवेदन दिले, आळंदी शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून पथविक्रेता म्हणून भाजी मंडई, झाडी बाजार, मरकळ चौक, आळंदी शहरातील विविध भागात पथविक्रेता म्हणून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या पथविक्रेत्यांना पथविक्रेता अधिनियम 2014 या कायद्याप्रमाणे न्याय द्या, आळंदी नगरपरिषदेने पथविक्रेत्यांची 2023 मध्ये अंतिम यादी प्रसिद्ध करून 2024 मध्ये पथविक्रेता समितीची निवडणूक घेण्यात आली.

निवडणूक झाल्यापासून 45 दिवसात समितीची बैठक घेऊन तत्काळ पथविक्रेत्यांना परवाना वाटप करावे असे सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला असून केंद्र शासन, राज्य शासनाने वेळोवेळी पथविक्रेत्यांच्या कल्याणासाठी त्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी धोरण केलेलं आहे. पण त्या कायद्याकडे दुर्लक्ष करत मनमानी कारभारातून पथविक्रेत्यांवर बेकायदेशीरपणे कारवाई केली जाते. ती कारवाई तत्काळ थांबून पहिले झोन तयार करा, एखादा पथविक्रेता बाधित होत असेल तर त्याला पहिल्यांदा योग्य ठिकाणी पुनर्वसन देऊन न्याय दिला पाहिजे असा राजपत्रीत कायदा आहे.

पण त्या कायद्याकडे दुर्लक्ष करत २ वर्षे होत आले आहेत. पथविक्रेता अधिनियम 2014 या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी न करता उलट पथविक्रेत्यांनवर मनमानी कारभारातून कारवाई करण्यात येते पण आता असे चालणार नाही तत्काळ परवाने द्या झोन निर्माण करा, आपण या निवेदनाची योग्य दखल न घेतल्यास महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल संलग्न महाराष्ट्र राज्य पथारी सुरक्षा दल या संघटनेच्या वतीने आपल्या नगरपरिषदेसमोर जाहीर लक्षवेधी बोंब मारो आंदोलन करण्यात येईल असा इशारा पुणे जिल्हा अध्यक्ष तसेच समिती सदस्य संतोष सोनवणे यांनी दिला. त्यावर मुख्याधिकारी महादेव खांडेकर यांनी निवेदन घेऊन आश्वासन दिले आहे की, कोणत्याही पथविक्रेत्यांवर अन्याय होणार नाही आम्ही लवकरच परवाना वाटप करुण झोन तयार करणार आहोत असे मुख्याधिकारी यांनी सांगितले. शिष्टमंडळामध्ये पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष सोनवणे, सचिन काळे, निलेश ढोकणे, गजानन मिटकरी, अमोल ढाले, तुकाराम बोडरे, मनोहर धनगर, दिडांळ मामा, ज्ञानेश्वर जाधव, धीरज कांबळे, सलमा मुलानी, वर्षाताई, महेबूब शेख सह कार्यकर्ते महिला आघाडी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!