वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांना पत्रकार प्रणिल कुसाळे यांचा थेट सवाल !
“मोबीनशेख -महाकालीवर कारवाई झाली, तर पुण्यातील गॅंगस्टरांवर कारवाई का नाही?
अक्षराज : प्रतिनिधी
दि.०१, पुणे : कायद्याचं राज्य की माफियांचा माज?
सामान्य पुणेकर सुरक्षित की गुन्हेगारांच्या दयेवर?
शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यावर पुन्हा एकदा गुन्हेगारीची काळी छाया दाटली आहे. नागरिकांना आजही आठवते ती ‘सिंघम स्टाईल’ कारवाई – जेव्हा मोबीन शेख आणि महाकाली भाई यांसारख्या कुख्यात गँगस्टर्सचा पोलिसांनी थेट एन्काऊंटर करून त्यांच्या पापाचा शेवट केला. आयपीएस अधिकारी राम जाधव यांनी राजकीय दबाव झुगारून कायद्याचे राज्य प्रस्थापित केले होते.
गुन्हेगारी पुन्हा बोकाळली… मात्र, आज परिस्थिती पुन्हा गंभीर आहे. निलेश घायवळ, आंदेकर, टोळी गँग आणि गल्लीबोळातील टोळ्यांनी डोके वर काढले आहे. ड्रग्ज रॅकेट्स, खंडणी (रंगदारी), खून आणि अल्पवयीन मुलांमध्ये वाढणारे व्यसनाधीनत्व… यामुळे शहराची सुरक्षितता धोक्यात आली आहे. परदेशात बसून टोळ्या दबाव निर्माण करत आहेत आणि त्यांचे स्थानिक हस्तक सामान्य पुणेकरांवर अत्याचार करत आहेत.

आयुक्तांना थेट सवाल !
या पार्श्वभूमीवर पत्रकार प्रणिल कुसाळे यांनी पोलीस आयुक्तांना थेट आणि धारदार प्रश्न विचारला आहे:
आयुक्त साहेब, राजकीय दबावापुढे झुकणार की ‘सिंघम स्टाईल’ कारवाई करणार?
येरवडा येथील कुख्यात गुंड मोबीन शेख आणि महाकालीवर त्या वेळी सात ते आठ एन्काऊंटर झाले, मग आजच्या गँगवर कारवाई का नाही?
सामान्य पुणेकरांना कायद्याची हमी मिळणार की गुन्हेगारांच्या दयेवर जगावे लागणार?
पुण्याला पुन्हा एकदा धाडसी, निर्भीड, एन्काऊंटरला न घाबरणारे अधिकारी हवे आहेत. अन्यथा, हे शहर लवकरच गुन्हेगारांच्या कैदेत जाईल,
अशी भीती नागरिकांना सतावते आहे.
“राजकीय दबाव झुगारा, एन्काऊंटर करा, पुण्याला पुन्हा राम जाधव सारखे ‘सिंघम’ पोलीस द्या!” पोलीस आयुक्त पुढचं पाऊल उचलतील का ?ल का? (Encounter) सारखी कारवाई होईल का, की गुन्हेगारांच्या दहशतीखाली पुणे शहर व पुण्यातील नागरिक पुन्हा घुटमळणार आहे?