कोंढव्यात गणपती मंडपाजवळ गोळीबार; तरुणाच्या पायात गोळी घुसली

Spread the love

कोंढव्यात गणपती मंडपाजवळ गोळीबार; तरुणाच्या पायात गोळी घुसली

अक्षराज : प्रणिल कुसाळे
दि. ०७, कोंढवा (पुणे) :
कोंढवा बुद्रुक येथील लक्ष्मीनगर परिसरात गणपती मंडपाजवळ झालेल्या वादातून गोळीबाराची गंभीर घटना घडली. या गोळीबारात एका २७ वर्षीय तरुणाच्या डाव्या पायाच्या पोटरीत गोळी लागून तो गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (दि.६) रात्री ११ ते ११.३० वाजण्याच्या सुमारास लक्ष्मीनगर गल्ली क्रमांक ६ येथे घडली.
याप्रकरणी सौरभ अनिल त्रिबंके यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, सौरभ त्रिबंके हे मित्र बंटी पवार यांच्यासोबत घराबाहेर रस्त्यावर गणपती मंडपाच्या बांधकामाजवळ गप्पा मारत थांबले होते.

त्यावेळी पूर्वी झालेल्या वादाच्या कारणावरून चिक्या ऊर्फ आरोह सनी पिल्ले, दादू भालेराव, जाम्बा आणि अन्य आठ ते दहा जणांनी एकत्र येत परिसरात आरडाओरडा व दहशत निर्माण केली.
फिर्यादीनुसार, दादू भालेराव याने जवळील पिस्तुलातून जिवे मारण्याच्या उद्देशाने सौरभ त्रिबंके यांच्या दिशेने गोळी झाडली. ही गोळी त्यांच्या डाव्या पायाच्या पोटरीतून आरपार गेल्याने ते गंभीर जखमी झाले.
या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून,फरार झालेल्या आरोपीचा शोध सुरू आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!