पहाटे घरफोड्या, दिवसा चोरी; चोरट्यांचा बिडी कामगार परिसरावर डोळा

Spread the love

पहाटे घरफोड्या, दिवसा चोरी; चोरट्यांचा बिडी कामगार परिसरावर डोळा

अक्षराज : प्रणिल कुसाळे
दि.०५, येरवडा (पुणे ) :
पुण्यातील येरवडा येथील बिडी कामगार परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मंगळवारी पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सलग ४ ते ५ घरांमध्ये घरफोडी केली. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला असून नागरिकांनी पोलिसांकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
पोलिसांनी घटनास्थळी भेट देत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथकांकडून तपास सुरू आहे. दरम्यान, (दि.५) सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास याच बिडी कामगार परिसरात भरदिवसा चोरीची आणखी एक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

त्यामुळे चोरटे पोलिसांचा धाक न बाळगता सर्रास गुन्हे करत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या सर्व घटनांची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ गुर्रम आणि सुमित डोके यांनी तातडीने लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तसेच परिसरात नियमित पोलीस गस्त वाढवून चोरट्यांना तातडीने अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!