“पुण्यात प्रेमकथा घडली थरकाप ! संगमवाडीत हत्या आणि रेल्वे रुळावर युवकाचा मृत्यू
अक्षराज : प्रणिल कुसाळे
दि.३०, येरवडा (पुणे) : संगमवाडी परिसरात प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या दुहेरी मृत्यूच्या घटनेने शहर हादरले आहे.
संगमवाडीत भाडेतत्त्वावर राहणारा गणेश काळे आणि दिव्या निगोत (२२) यांच्यात काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. या नात्यातील तणाव शिगेला पोहोचल्यानंतर काळे यांनी आपल्या राहत्या खोलीत दिव्याची हत्या केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांकडून व्यक्त झाला आहे. घटनेनंतर काळे तळेगाव ढमढेरे येथे गेला आणि रेल्वे रुळांवर मृत अवस्थेत आढळला. प्राथमिक माहितीनुसार, त्यांनी धावत्या रेल्वेखाली उडी मारली असावी, असा संशय आहे; मात्र हा मृत्यू आत्महत्या आहे की इतर कारणाने, हे तपासानंतर स्पष्ट होईल.
अधिक माहिती समोर आली आहे की दोघेही रुबी हॉल हॉस्पिटल मध्ये कार्यरत होते, आणि दिव्याचे वडील येरवडा पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी आहेत, ज्यामुळे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे ठरले आहे. पोलिस तपास जोरात सुरू आहेत.
पुढील तपास येरवडा पोलीस करत आहे



