मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मोठ्या नियुक्त्या जाहीर
राहुल कामत जिल्हाध्यक्ष, हर्षद पाटील डोंबिवली शहराध्यक्ष; नेमणूक एका वर्षासाठी
अक्षराज : विनोद वास्कर
दि.०२, कल्याण (ठाणे) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डोंबिवली विधानसभा व कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील संघटन अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. दिनांक ०१ जुलै २०२६ रोजी पक्षाच्या लेटरहेडवर या नियुक्त्या प्रसिद्ध करण्यात आल्या.
नव्या दमाच्या पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी
जाहीर झालेल्या यादीनुसार डोंबिवली विधानसभा व कल्याण ग्रामीण विधानसभा जिल्हा अध्यक्षपदी श्री. राहुल कामत यांची, तर डोंबिवली शहर अध्यक्षपदी श्री. हर्षद पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
इतर नियुक्त्या पुढीलप्रमाणे :-
नाव पद
प्रल्हाद म्हात्रे जिल्हा संघटक – डोंबिवली विधानसभा
तुषार पाटील जिल्हा संघटक – कल्याण ग्रामीण विधानसभा
संदेश पाटील विधानसभा अध्यक्ष – डोंबिवली विधानसभा
विनोद पाटील विधानसभा अध्यक्ष – कल्याण ग्रामीण विधानसभा
अरुण जांभळे जिल्हा सचिव – डोंबिवली व कल्याण ग्रामीण
योगेश पाटील उप-जिल्हा अध्यक्ष – कल्याण ग्रामीण
राजू पाटील उप-जिल्हा अध्यक्ष – डोंबिवली विधानसभा
प्रशांत गावडे शहर अध्यक्ष – दिवा
भाग्येश इनामदार उप शहर अध्यक्ष – डोंबिवली विधानसभा

‘कुचराई खपवून घेतली जाणार नाही’ – राज ठाकरे
पत्रात राज ठाकरे यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. “मनसेची ध्येय धोरणे व कार्यक्रम वेळोवेळी निष्ठेने राबवा. यामध्ये कोणतीही कुचराई अथवा तडजोड स्वीकारली जाणार नाही. आपण व आपल्या सहकाऱ्यांकडून समाजाला कोणत्याही प्रकारचा उपद्रव होणार नाही, अशी अपेक्षा आहे,” असे त्यांनी नमूद केले आहे.
नेमणूक एका वर्षासाठी
सर्वांची नेमणूक एक वर्षाच्या कालावधीसाठी असून पदाचा कार्य अहवाल पाहूनच पुढील मुदतवाढी संदर्भात निर्णय घेतला जाईल, असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. “मराठी बांधवांना, भगिनींना आणि मातांना अभिमान वाटेल अशा प्रकारचे कार्य आपल्या सर्वांच्या हातून घडो,” अशी ईश्वर चरणी प्रार्थना करत राज ठाकरे यांनी सर्वांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. डोंबिवली-कल्याण ग्रामीण हा मनसेचा महत्त्वाचा मतदारसंघ असून या नव्या नियुक्त्यांमुळे आगामी काळात संघटनेला बळ मिळेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.




