शिळगाव स्मशानभूमीच्या दुरुस्तीला गती; उद्या भूमी अभिलेख विभागाची मोजणी

Spread the love

अक्षराज मीडियाच्या बातमीनंतर शिळगाव स्मशानभूमीच्या दुरुस्तीला गती; उद्या भूमी अभिलेख विभागाची मोजणी

अक्षराज : विनोद वास्कर
दि.०६, शिळगाव (ठाणे) :
शिळगाव स्मशानभूमीच्या दुरवस्थेबाबत अक्षराज मीडियाने यापूर्वी आवाज उठवला होता. या बातम्यांची दखल घेत प्रशासनाने दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे.

सध्या स्मशानभूमीत मुख्य प्रवेशद्वाराचे गेट बसवणे, पाण्याची टाकी बसवणे, शेडला नवीन पत्रे मारणे आणि शेगड्यांची दुरुस्ती ही कामे पूर्ण झाली आहेत.

मात्र, नळ कनेक्शन असूनही गेल्या चार महिन्यांपासून पाणी येत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच स्मशानभूमीकडे येण्या-जाण्याच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठाणे महानगरपालिकेने आणि स्थानिक नगरसेवकांनी याकडे लक्ष देऊन पाणी व रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे.

महत्वाची सूचना :
भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी वसंत पंढरीनाथ उगले हे उद्या दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजता मोजणीसाठी येणार आहेत. तरी शिळगावातील जास्तीत जास्त ग्रामस्थांनी उपस्थित राहावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!