अडवली-भुतवली उड्डाणपुलाजवळील धोकादायक कटने घेतला बळी, शिळ गावातील तरुणाचा अपघाती मृत्यू
अक्षराज : विनोद वास्कर
दि.०४, महापे (नवी मुंबई) : महापे-शिळफाटा रोडवर अडवली-भुतवली गावाजवळील उड्डाणपुलाच्या पुढे असलेला धोकादायक कट वाहनचालकांसाठी कर्दनकाळ ठरला आहे.
या कटमधून शिळफाट्याकडून येणारी वाहने विरुद्ध दिशेने घुसतात, तर उड्डाणपुलावरून येणाऱ्या वाहनांना अचानक ब्रेक लावावा लागतो. HP पंपाजवळ असलेल्या या कटमुळे येथे रोज अपघात आणि वाहतूक कोंडी होते.
मागील २५ सप्टेंबर२०२६ रोजी याच ठिकाणी झालेल्या अपघातात शिळ गावातील सावित्री नगर येथील रहिवाशी सचिन विष्णू गायकवाड या तरुणाला आपला जीव गमवावा लागला.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, हा मोठा कट तात्काळ बंद करण्यात यावा. उड्डाणपुवरून ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी सुरक्षित व्यवस्था करून ठोस पावले उचलावीत, जेणेकरून भविष्यात कोणत्याही नागरिकाचा नाहक बळी जाणार नाही.



