खुणाचा प्रयत्न व मोका अंतर्गत गंभीर गुन्ह्यातील आरोपीला तीन महिन्यात सोलापुरातून अटक

Spread the love

खुणाचा प्रयत्न व मोका अंतर्गत गंभीर गुन्ह्यातील आरोपीला तीन महिन्यात सोलापुरातून अटक

अक्षराज : प्रमोद दिवेकर
दि.२६, पुणे :
पुणे शहर पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे मा.वरिष्ठ्यांच्या आदेशाने घरफोडी करणारे, वाहनचोरी,मोबाईल चोरी, जबरी चोरी करणारे,दरोडा मोका,दरोड्याची तयारी इ. गुन्ह्यातील चेक आरोपी करत असताना कोथरूड पोलीस स्टेशन मधील गुन्ह्यातील रेकॉर्डवर असणारा आरोपी पिंटुसिंग रणबीरसिंग दुधाणी वय 42वर्षे रा.आंबेडकर नगर, मार्केटयार्ड पुणे यावर गु.र.नं. 131/2023,भा.न्या.सं.क. 109,118(1),115(2),352,351(2)(3),189(2),191(2),190,आर्म ऍक्ट 4(25),म.पो.अधि. क. 37(1)(3)सह 135महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम सन 1999चे कलम 3(1)(¡¡), 3(4) हा सोलापूर येथे असलेबाबत पोलीस अंमलदार 8442महेश पाटील यांना गोपनीय बातमीदारकडून खात्रीशीर माहिती मिळाली.

प्राप्त बातमीची खात्रीशीर माहिती मिळताच दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 01चे पोलीस उपनिरीक्षक फडतरे पोलीस अंमलदार बाळू गायकवाड, महेश पाटील, अमित गद्रे, साई कारकेयांच्या पथकाने सोलापूर तालुका पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या मदतीने आरोपीच्या तळे, हिप्परगी, जि. सोलापूर येथे राहत्या घराजवळ सापळा रचून दि. 25/08/2026रोजी सकाळी 8:00वाजता ताब्यात घेतले असता आरोपीचे नाव व पत्ता याची खात्री झाली. आरोपीकडे नमूद गुन्ह्यांची चौकशी केली असता त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. पुढील कायदेशीर कारवाई करीता आरोपीस मा.सहाय्यक पोलीस आयुक्त, कोथरूड विभाग यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मार्गदर्शन : अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे ) श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस आयुक्त (गुन्हे) गौहर हसन, सहा.पोलीस आयुक्त गुन्हे 3 शंकर खटके
तपास व अंमलबजावणी पथक : दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक -1पोलीस निरीक्षक मारुती खेडकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे, पोलीस अंमलदार बाळू गायकवाड,महेश पाटील, साई कारके, अमित गद्रे, प्रदीप राठोड, रविंद्र लोखंडे, अजित शिंदे, साधना पवार, विद्या पऱ्हाड व नारायण बनकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!