एकल महिला योजनेचे विशेष नोंदणी अभियान उत्साहात संपन्न – ६०० महिलांची नोंदणी

Spread the love

एकल महिला योजनेचे विशेष नोंदणी अभियान उत्साहात संपन्न – ६०० महिलांची नोंदणी

अक्षराज : विनोद वास्कर
दि.२७,पडले गाव (ठाणे ) :
ठाणे महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या एकल महिला योजनेअंतर्गत नगरसेवक बाबाजी बाळाराम पाटील व नगरसेविका अर्चनाताई पाटील यांच्या संयुक्त प्रयत्नातून जनसंपर्क कार्यालय, बी.के वॉटर पार्क, पडले-डायघर रोड येथे विशेष नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

या अभियानात ६०० हून अधिक महिलांनी नोंदणी केली. विधवा, घटस्फोटित, विभक्त आणि आधाराची गरज असलेल्या एकल व ज्येष्ठ महिलांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.

यावेळी ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच विभागप्रमुख विष्णू कोटकर, निलेश पाटील, मधुकर पाटील, नवनाथ पाटील, नाना मोकाशी, शुभम पाटील, देविदास पाटील, रणजीत पाटील, विनायक पाटील, प्रताप पाटील, राजेश म्हात्रे यांच्यासह अनेक शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

असे नगरसेवक बाबाजी पाटील व नगरसेविका अर्चना पाटील यांनी माहिती दिली. दि.२७ ऑगस्ट पर्यंत राहिलेल्या पात्र महिलांनी दिवा प्रभाग समिती, खार्डी गाव येथील कार्यालयात संपर्क साधून या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व कोणीही वंचित राहू नये, असे आवाहन नगरसेवक बाबाजी पाटील व नगरसेविका अर्चना पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!