नाशिकमध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद राज्यस्तरीय बैठक संपन्न

Spread the love

नाशिकमध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद राज्यस्तरीय बैठक संपन्न

ओबीसींचे आरक्षण संपलेले नाही : छगन भुजबळ

जरांगेंची लढाई सरकारशी, आमच्याशी नाही

अक्षराज : वसंत रांधवण
दि.२४, अहिल्यानगर :
ओबीसींचे आरक्षण संपले आहे, असे विधान आपल्याला कदापी मान्य नाही. जात पडताळणी प्रक्रियेत जिथे चुका होत आहेत, तिथे कायदेशीर लढाई सुरू आहे. मनोज जरांगे यांची लढाई आमच्या विरोधात नाही तर सरकारच्या विरोधात आहे. त्यामुळे सरकारच यावर योग्य निर्णय घेऊन मार्ग काढेल, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केले.
मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची मेट भुजबळ नॉलेज सिटी आडगाव येथे राज्यस्तरीय प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी (दि.२३) झाली. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना भुजबळ यांनी ओबीसी आरक्षण, जरांगे यांचे आंदोलन आणि जातनिहाय जनगणनेबाबत भूमिका स्पष्ट केली.


ते म्हणाले, आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नसून वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा मार्ग आहे. जातनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी समता परिषदेने सातत्याने पाठपुरावा केला. गरज पडल्यास मंत्रिपदाचा त्याग करूनही समाजाच्या प्रश्नांसाठी लढलो असून, आता सरकार सकारात्मक असल्याने चर्चेतून प्रश्न सोडवण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. जात पडताळणी प्रक्रियेत जिथे चुका होत आहेत, तिथे आपण कायदेशीर लढाई लढत आहोत. ओबीसींमध्ये कोणत्या जातीचा समावेश असावा यावर सरकार निर्णय घेईल. तसेच, प्रत्येक राज्यात ओबीसी समाजाचा शोध घेण्याच्या त्यांच्या मागणीवर सरकार काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्रात माळी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. जेव्हा जेव्हा समाजावर किंवा आरक्षणावर संकट आले, तेव्हा मंत्रिपदाचा राजीनामा देऊन मी राज्यभर फिरलो. छगन भुजबळ घाबरणारा माणूस नाही. गरज होती तेव्हा आपण मैदानात उतरून लढलो आहोत. पण आता सरकार आपल्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याने आम्ही चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्यावर भर देत आहोत, असे त्यांनी सांगितले.

आज नाशिक येथील भुजबळ नॉलेज सिटी येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची राज्य कार्यकारिणी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विधानपरिषदेचे आमदार पंकज भुजबळ यांना दैनिक अक्षराज वृत्तपत्राच्या पाचव्या वर्धापनदिनाचा विशेष अंक भेट देताना अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी वसंत रांधवण,समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

समाजातील जे वंचित घटक आहे. जो अडलेला आहे त्या प्रत्येक व्यक्तीला मदतीचा हात देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम प्रत्येक समता सैनिकाने अविरतपणे केले पाहिजे. समीर भुजबळ हे खासदार म्हणून संसदेत काम करत असताना त्यांनी देशातील ओबीसी खासदारांना एकत्र करून केंद्र सरकारकडे मागणी देखील केली. यावेळी आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, प्रदेश कार्याध्यक्ष बापू भुजबळ, डॉ. कैलास कमोद, ईश्वर बाळबुधे, ऍड. राजेंद्र महाडोळे, प्रा. सत्संग मुंडे, ऍड. मंगेश ससाणे, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, सदानंद म डळिक, गुफरान शब्बीर अन्सारी, डॉ. नागेश गवळी, डॉ. स्नेहा सोनकाटे, प्रा. दिवाकर गमे, शंकरराव लिंगे, सुनील मेटे, मंजिरी धाडगे, माया इरतकर, प्रा. संतोष वीरकर, समाधान जेजुरकर, रवींद्र खरात यांच्यासह राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!