ठाणे-पालघर जिल्हा बँक कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट; २०% बोनसला संचालक मंडळाची मंजुरी

Spread the love

२९.१८ कोटींची तरतूद, कोणत्याही प्रकारची कपात न करण्याचा निर्णय


अक्षराज : विनोद वास्कर
दि. २४, देसाई (ठाणे) :
ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. च्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. दि. २२/०७/२०२६ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत सर्व कर्मचाऱ्यांना २०% बोनस देण्यास एकमताने मंजुरी देण्यात आली आहे.

२९.१८ कोटींची तरतूद
बँक प्रशासनाने यासाठी २९.१८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यावेळी बोनस वितरित करताना कोणत्याही प्रकारची कपात (Cutting) न करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. याविषयी बँक प्रशासनाला दि. १३ जुलै २०२६ ला लेखी पत्रव्यवहार करून कळविण्यात आले होते.

खात्यात तात्काळ जमा करण्याची विनंती
या संदर्भात मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन बोनसची संपूर्ण २०% रक्कम कोणतीही कपात न करता प्रत्येक कर्मचाऱ्याच्या खात्यात तात्काळ जमा करण्याची विनंती करण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांना आवाहन !
बँकेचे संचालक श्री. आकाश बाबाजी पाटील यांनी सर्व कर्मचारी बांधवांना आवाहन केले आहे की, आपल्या खात्यात संपूर्ण २०% बोनस जमा झाला आहे याची खात्री करावी. जर बोनसमध्ये कोणत्याही प्रकारची कपात झाल्याचे आढळल्यास, कृपया त्वरित ९०७६१४११११ या क्रमांकावर संपर्क साधावा. बँक प्रशासन कर्मचारी हितासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.आकाश बाबाजी पाटील संचालक दि. ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!