शिळगावात ठाणे महानगरपालिकेचा हातोडा !

Spread the love

शिळगावात ठाणे महानगरपालिकेचा हातोडा !

अक्षराज : विनोद वास्कर

दि.०३, शिळगाव (ठाणे) : शिळगावातील महाकालेश्वर मंदिराशेजारी असलेल्या एका इमारतीवर ठाणे महानगरपालिकेने आज गुरुवार दि.०३ सप्टेंबर २ ० २ ६ रोजी कारवाईचा बडगा उगारला आहे. यावेळी स्वतः दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त या ठिकाणी उपस्थित राहून कारवाई करून घेत आहे.

तसेच या अगोदर सुद्धा ५३ इमारतींना नोटीस देण्यात आली आहे, त्याची माहिती सुद्धा दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त यांनी ठाणे आयुक्तांकडे पाठवली आहे. लवकरच त्या ठिकाणी सुद्धा कारवाई होईल. सध्या ज्या बिल्डिंग व कारवाई होत आहे, न्यायालयीन आदेश असल्यामुळे कारवाई होत आहे. असे सांगण्यात आले आहे.

याकामी सहा ब्रेकर मशीन आणि मनुष्यबळ लावण्यात आले आहे. तसेच शिळ डायघर पोलीस स्टेशन चा बंदोबस्त सुद्धा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!