निलेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबियांची मागणी

Spread the love

निलेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबियांची मागणी

अक्षराज : विनोद वास्कर
दि. २९, दिवा (ठाणे) :
शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या महानगरपालिका कर्मचाऱ्याला मारण्याची धमकी देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी निलेश पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी पीडित कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांनी केली आहे.

या संदर्भात पीडित कर्मचारी महेश रघुनाथ वाघमारे यांच्या पत्नी प्राजक्ता वाघमारे आणि मुलगा साहिल वाघमारे यांनी तसेच धडाकेबाज युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अमोल केंद्रे यांनी दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त आणि दिवा प्रभाग समिती सभापती यांना निवेदन दिले आहे.

नेमकं काय घडलं?

ठाणे महानगरपालिका अंतर्गत दिवा प्रभाग समिती, बाजार वसुली विभागात कार्यरत असलेले महेश वाघमारे हे दि. २८/०९/२०२६ रोजी रात्री ८.३० वाजता साबेगाव, दिवा पूर्व येथे फेरीवाल्यांना ताबा पावत्या देण्याचे शासकीय कर्तव्य बजावत असताना निलेश पाटील यांनी त्यांना मारण्याची धमकी दिली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर प्रसारितही करण्यात आले. एका प्रामाणिक कर्मचाऱ्याला कर्तव्य बजावत असताना धमकावणे हे अत्यंत गंभीर असून सदर घटनेची निष्पक्ष चौकशी करून व्हिडिओ पुराव्याच्या आधारे निलेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी वाघमारे कुटुंबीयांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!