भाजप दिवा मंडळाची विस्तारित कार्यकारिणी बैठक उत्साहात संपन्न
अक्षराज : विनोद वास्कर
दि.२८, दिवा (ठाणे) :
दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा अंतर्गत दिवा मंडळाची विस्तारित कार्यकारिणी बैठक रविवार, दि. २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता सुमित हॉल, मेट्रो हॉस्पिटल जवळ, दिवा चौक येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. ही बैठक सायंकाळी ५ ते साडेसात वाजेपर्यंत सुरू होती. बैठकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस हार अर्पण करून व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ठाणे शहर सरचिटणीस विक्रम भोईर उपस्थित होते.
बैठकीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ वर्षे जनसेवेचे काम केले आहे, गुजरातचे मुख्यमंत्री १२ वर्ष ७ महिने आणि भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांनी १२ वर्षे ४ महिने काम केले आहे आणि अजूनही ते काम करत आहेत, अशी माहिती देण्यात आली. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कामाची माहिती सर्व पदाधिकाऱ्यांना देण्यात आली. याप्रसंगी दोन राजकीय प्रस्तावना सादर करण्यात आल्या असून उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात त्याला अनुमोदन दिले. बैठकीच्या शेवटी भारतीय जनता पार्टीसाठी मोलाचे योगदान दिलेल्या व आज आपल्यात नसलेल्या दिवंगत कार्यकर्त्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रीय गीत (वंदे मातरम्), महाराष्ट्र गीत आणि राष्ट्रगीताने (जन गण मन) बैठकीचा समारोप करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवर : विक्रम भोईर ठाणे जिल्हा शहर सरचिटणीस, दिवा-शिळ मंडळ अध्यक्ष सचिन भोईर,अशोक पाटील (माजी नगरसेवक तसेच ठाणे जिल्हा कार्यकारी सदस्य), विजय भोईर (ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष), सुमित भोईर ,मनोज प्रजापती (कामगार आघाडी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष), दिलीप भोईर (दिवा-शिळ मंडळ कोषाध्यक्ष), कमलाकर पाटील (मा. कार्यकारी सदस्य), सतीश केळशीकर (ठाणे जिल्हा अनुसूचित जमाती मोर्चा सरचिटणीस, दिवा मंडळ सरचिटणीस समीर चव्हाण महिला मोर्चा अध्यक्षा सपना भगत, प्रफुल साळवी (अनुसूचित जाती अध्यक्ष), अशोक मिश्रा (उत्तर भारतीय मोर्चा उपाध्यक्ष), निवृत्ती म्हात्रे, सुवर्णा म्हात्रे यांच्यासह जिल्हा पदाधिकारी, विशेष निमंत्रित सदस्य, सर्व मोर्चा व प्रकोष्ठ अध्यक्ष आणि समस्त कार्यकारिणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. विक्रम भोईर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, येणाऱ्या काळात भाजपाचे सुद्धा नगरसेवक दिवा मध्ये असतील. कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले जाईल. लहानात लहान काम असो ते सुद्धा आपण प्रामाणिकपणे केले पाहिजे. तसेच प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि त्यानंतर आपण स्वतः या मंत्राने काम करा.



