महापे ते शिळफाटा,शिळफाटा ते तळोजा संपूर्ण ट्राफिक जाम

Spread the love

महापे ते शिळफाटा,शिळफाटा ते तळोजा संपूर्ण ट्राफिक जाम

अक्षराज : महादेव चव्हाण
दि.२६, महापे (ठाणे) :
रोज मरे त्याला कोण रडे या म्हणीप्रमाणे महापे, शीळफाटा, तळोजा या रस्त्याची व मार्गाची अवस्था झालेली आहे.
गेली १५ दिवसापासून मोठ्या गाडी, मोठे कंटेनर तसेच इतर लहान सान वाहने या मार्गावर चालत असताना एरवी या मार्गाची वाहतूक अगदी घिम्या गतीने चालू असते. परंतु आता पूर्णपणे ट्रॅफिक जाम होऊन नोकरवर्ग, विद्यार्थी तसेच रुग्णाचेही अतोनात हाल होत आहेत. दररोज कामावर जाता येता सर्वसामान्य लोकांनाही तीन ते चार तास या ट्राफिक मध्ये अडकून पडावे लागत आहे.

प्रशासन यावर कधी काम करणार, ट्राफिक पोलीस फक्त नाक्यावर उभे राहतात त्यामुळे इतर ठिकाणचे वाहने वेडी वाकडे वळणे घेऊन जाम होत आहेत. पोलीस प्रशासन याकडे कधी लक्ष देणार, व आमचा प्रवास कधी सुखकर होणार असा प्रश्न या रस्त्यावर प्रवास करणारे तसेच येथील रहिवासी यांच्याकडून सर्व नागरिकांकडून विचारला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!