शिळफाटा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटता सुटेना !
TMC-NMMC कडे यंत्रणा नाही का? शिळ-दहिसर मार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात
अक्षराज : विनोद वास्कर
दि.२६, शिळफाटा (ठाणे) : शिळ फाटा-दहिसर मार्गावर भंगार गोदामे, गॅरेज, वजन काटे, अनधिकृत कट, हातगाड्या व हॉटेल पार्किंगमुळे रोज २-३ तास कोंडी. हॉटेलांना पार्किंग नसल्याने वाहने रस्त्यावरच लावून ग्राहक तासन्तास बसतात, गॅरेजसमोर रस्त्यावरच दुरुस्ती सुरू असते. TMC/NMMC कडे यंत्रणा असूनही ६ महिन्यात शून्य कारवाई.
स्थानिक नागरिक व दररोज ये-जा करणाऱ्या वाहन चालकांची एकमुखी मागणी :
१) बेकायदा कट कमी करा २) वजन काटे, गॅरेज, भंगार गोदामे हटवा ३) हातगाड्या हटवा ४) हॉटेलांना पार्किंग सक्ती करा ५) ४८ तासात संयुक्त कारवाई करा.
इशारा : शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन कारवाई सुरू न केल्यास सर्व नागरिक रस्त्यावर उतरतील.



