कोठडीतील मारहाणीच्या आरोपांप्रकरणी १३ पोलिसांवर गुन्हा

Spread the love

कोठडीतील मारहाणीच्या आरोपांप्रकरणी १३ पोलिसांवर गुन्हा

अक्षराज : प्रणिल कुसाळे

दि.२४, पुणे : भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आरोपींना बेकायदेशीररीत्या ताब्यात ठेवून मारहाण केल्याच्या आरोपांप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्यासह १३ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाच्या निर्देशानंतर या प्रकरणात कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस उपनिरीक्षक अण्णा मधुकर दराडे, निलेश राजेंद्र मोकाशी, पोलीस हवालदार सुनील दादा हनवते तसेच सागर चंद्रकांत बोरगे, सोहम कैलास शेंडकर, राहुल अशोक औंधकर, मितेश दत्तात्रय चोरमोले, रवींद्र शंकर गायकवाड, संदीप लक्ष्मण आगळे यांच्यासह फकीर, सुतार आणि पवार या पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे.
पोलिसांकडून आरोपींना मारहाण, धमकावणे, बेकायदेशीररीत्या डांबून ठेवणे आणि अपमानास्पद वर्तन केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. चौकशीदरम्यान काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्यानंतर मानवाधिकार आयोगाने संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेतली.
या प्रकरणात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्याने संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवरील आरोप सिद्ध झाले आहेत, असा त्याचा अर्थ नसून तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!