६१ किलोग्रॅम वजनाच्या गांजासह स्कॉर्पिओ कार असा एकुण ४० लाख ६६ हजार रु.किंमतीचा मुद्देमाल जप्त

Spread the love

स्थानिक गुन्हे शाखा,पुणे ग्रामीण ची मोठी कारवाई !

अक्षराज : प्रमोद दिवेकर
दि:24, शिरूर (पुणे ) :
नशामुक्त भारत अभियानाचा व ड्रग्स फ्रि महाराष्ट्र या उपक्रमाची सुरूवात करणेत आलेली असून प्राधान्याने कारवाया करून नशामुक्त देश करण्याचे अनुषंगाने पुणे ग्रामीण हद्दीत अंमली पदार्थ तसेच तंबाखूजन्य पदार्थाची बेकायदेशीर रित्या विक्री अगर सेवन होवू नये या करीता विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा साो कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर, व संदीप सिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी अवैध व्यवसायांवरील कारवाईचा बडगा चालू ठेवत अवैध रित्या अंमली पदार्थ व तंबाखूजन्य पदार्थ विनापरवाना जवळ बाळगणारे विक्री करणारे व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, स्थानिक गुन्हे शाखा यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार अंमली पदार्थ व तंबाखुजन्य पदार्थ जवळ बाळगणारे विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची पथके तयार करण्यात आली आहेत.

त्या अनुषंगाने दिनांक २३/०९/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गणपतीच्या अनुषंगाने शिरुर परिसरात गस्त करत असताना शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत अंमली पदार्थाची बेकायदेशीर रित्या देवाण-घेवाण होणार असून खात्रीशीर माहिती काढून कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल साो. पुणे ग्रामीण, यांनी पथकाला दिले होते. स्था.गु.शा.चे पथकाने पोनि प्रमोद क्षीरसागर यांचे मार्गदर्शनाखाली माहिती काढत असताना पो.हवा. तुषार पंधारे, नेम. स्था.गु.शा. यांना त्यांचे गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, इसम नामे पोपट विठ्ठल शितोळे रा. इचकेवाडी, कवठे येमाई ता. शिरुर जि.पुणे हा त्याचे ताब्यात प्रतिबंधीत गांजा अंमली पदार्थ बाळगून त्याची विक्री करणेसाठी मोजे कवठे येमाई ता.शिरुर जि.पुणे येथील शिरुर ते मंचर जाणारे रोडचे बाजुला इचकेवाडी येथे आरोपी याने त्याचे राहते घराचे समोर पार्ककेलेल्या पांढरे रंगाची स्कॉर्पीओ गाडी नं एम. एच १२ एच.झेड ०९३८ यामध्ये गांजा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी ठेवला आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली, त्या माहितीचे अनुषंगाने पथकाने कायदेशीर तरतुदींची पुर्तता करत उपविभागीय पोलीस अधिकारी शिरुर उप विभाग शिरूर यांचे आदेश प्राप्त केले. छापा कारवाईचे सर्व साहीत्य व पंचांसह स्था.गु. शाखेच पथक कारवाई साठी रवाना झाले. मिळालेल्या बातमीचे ठिकाणी पथकाने जावून छापा कारवाई केली. कारवाई दरम्यान आरोपी पोपट विठ्ठल शितोळे वय ५२ वर्षे रा. इचकेवाडी, कवठे येमाई ता. शिरुर जि. पुणे यास ताब्यात घेण्यात आले. त्यांचे ताब्यात ६१ किलोग्रॅम वजनाचा गांजा अंमली पदार्थ, स्कॉर्पीओ गाडी नं एम.एच १२ एच.झेड ०९३८ असा ४०,६६,०००/- रू.चा मुद्देमाल मिळून आला आहे. त्याबाबत शिरुर पोलीस स्टेशन गु.र.नं. ८४४/२०२६ एनडीपीएस कायदा कलम ८ (क), २०(ब) (क) (ii) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच पोलीस अधीक्षक, संदीप सिंह गिल्ल, साो. पुणे ग्रामीण, यांनी सर्व नागरिक आणि पालकांना नम्र आवाहन केले की, आपल्या जिल्ह्यातील युवा पिढीला अमली पदार्थाच्या प्राणघातक व्यसनापासून वाचवण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे. हे अवैध जाळे मुळापासून उखडून टाकण्यासाठी प्रत्येक नागरिकाची सतर्कता आणि सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या परिसरात अमली पदाथांची विक्री किंवा वाहतूक करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती देऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत करा. माहिती देणाऱ्या नागरिकाची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल. कोणतीही भीती न बाळगता निर्भयपणे पुढाकार घ्या. आपली एक गुप्त माहिती एखाद्या तरुणाचे भविष्य आणि एका कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित करू शकते. चला, अमली पदार्थमुक्त आणि सुरक्षित समाज घडवण्यात आपले योगदान द्या. असे सर्व नागरिकांना आवाहन केले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, पुणे विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भासले, शिरूर उपविभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, स्था.गु.शा.चे पोसई महेश डोंगरे, स्था.गु.शा.चे पोलीस अंमलदार संजय पड्याळ, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजु मोमीन, विकास पाटील, सागर धुमाळ, यांनी केली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास शिरुर पोलीस स्टेशन हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!