महात्मा फुले कृषि विद्यापीठातील बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजनेस राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्राचा पुरस्कार

Spread the love

महात्मा फुले कृषि विद्यापीठातील बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजनेस केंद्राचा पुरस्कार

अक्षराज : प्रमोद डफळ 

दि.१६, राहुरी (अहल्यानगर) : राहुरी विद्यापीठ  जम्मू येथील शेर-ए-काश्मीर कृषि विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठात झालेल्या अखिल भारतीय बियाणे विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या 41 व्या वार्षिक बैठकीमध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठातील बियाणे विभागातील बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजनेस सन 2025-26 या वर्षातील राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्र म्हणून गौरविण्यात आले. सदरचा पुरस्कार नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक (पीक शास्त्र) डॉ. डि.के. यादव आणि जम्मू येथील शेर-ए-काश्मीर कृषि विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.एन. त्रिपाठी यांच्या शुभहस्ते व नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे सहाय्यक महासंचालक (बियाणे) डॉ. पी.आर. चौधरी, उत्तर प्रदेशातील मऊ येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय बियाणे विज्ञान व तंत्रज्ञान संस्थेचे प्रकल्प संचालक डॉ. ए. आनंदन यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. सदरचा पुरस्कार प्रमुख शास्त्रज्ञ बियाणे डॉ. नरेंद्र काशीद, बियाणे संशोधन अधिकारी डॉ. सुरेश झांजरे, डॉ. कैलास भोईटे, डॉ. अनिल सूर्यवंशी, डॉ. अविनाश कर्जुले, डॉ. रश्मी भोगे, डॉ. कैलास गागरे आणि डॉ. दीपक गायकवाड यांनी स्वीकारला.

 या वार्षिक आढावा बैठकीत बियाणे रोगशास्त्र विषयातील दोन, बियाणे प्रक्रिया या विषयातील एक, बीजोत्पादन व प्रमाणिकरण या विषयातील एक, बियाणे कीटकशास्त्र या विषयातील एक अशा एकूण पाच शिफारशी राष्ट्रीय स्तरावर प्रसारित करण्यात आल्या आहेत. या आधी या बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजनेने राष्ट्रीय स्तरावर 68 तर राज्य स्तरावर 27 तंत्रज्ञान शिफारशी शेतकर्यांसाठी प्रसारीत केल्या आहेत. या योजनेस तीन वेळा राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट संशोधन केंद्र म्हणून गौरविण्यात आले आहे. बीजोत्पादनातील विविध अडचणी समोर ठेवून त्यासंदर्भातील नियोजन व संशोधन कार्यात महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे आणि संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके तसेच सहयोगी संशोधन संचालक डॉ. विजय शेलार यांचे बहुमोल मार्गदर्शन व बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजनेच्या शास्त्रज्ञांनी या संदर्भात केलेल्या संशोधनकार्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे यांनी या योजनेतील शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे. या योजनेला पुरस्कार मिळाल्याबद्दल या योजनेतील सर्व शास्त्रज्ञांची विद्यापीठाच्या सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!