येरवडा कारागृहात आरोपींचा थरार ; न्यायबंदीवर प्राणघातक हल्ला

Spread the love

येरवडा कारागृहात आरोपींचा थरार; न्यायबंदीवर प्राणघातक हल्ला


अक्षराज : प्रणिल कुसाळे

दि.१६, येरवडा (पुणे) : येरवडा कारागृहात सोमवारी पहाटे घडलेल्या एका गंभीर घटनेमुळे खळबळ उडाली आहे. कारागृहातीलच दोन न्यायबंदींनी तिसऱ्या न्यायबंदीवर झोपेत असताना दगडी फरशीने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली असून, जखमी न्यायबंदीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
ही घटना १५ डिसेंबर 2025 रोजी सकाळी सुमारे ६.४५ वाजण्याच्या सुमारास येरवडा कारागृहातील सी.जे. विभागातील बॅरेक क्रमांक ०१ मध्ये घडली. न्यायबंदी विशाल नागनाथ कांबळे (वय २८, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) हे बॅरेकच्या दरवाज्याजवळ झोपलेले असताना, त्यांच्यावर त्याच बॅरेकमधील आकाश सतिश चंडालीया आणि दीपक संजय रेड्डी यांनी अचानक हल्ला केला.
आरोपींनी दगडी फरशी उचलून विशाल कांबळे यांच्या डोक्यावर व कमरेवर वारंवार वार केले, असा आरोप आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यात कांबळे गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर कारागृह प्रशासनात एकच धावपळ उडाली असून, जखमी न्यायबंदीला तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले.
या प्रकरणी येरवडा कारागृहातील तुरुंग अधिकारी सचिन गोविंदराव गुरव यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजुम बागवान आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेशकुमार पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
कारागृहाच्या आत घडलेल्या या हिंसक घटनेमुळे येरवडा जेलमधील सुरक्षाव्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!