येरवडा–लक्ष्मीनगर पोलिसांनी गुटखा तस्करीवर घातला मोठा घाव
अक्षराज : प्रणिल कुसाळे
दि.१०, येरवडा (पुणे) : लक्ष्मीनगर, येरवडा परिसरात नववर्षाच्या सुरुवातीलाच येरवडा–लक्ष्मीनगर पोलिसांनी गुटखा तस्करीवर मोठा घाव घातला आहे. चारचाकी पिकअप टेम्पोमधून बेकायदेशीर माल वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस भीमराव कांबळे यांना मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.
या कारवाईत ८ लाख ३३ हजार ८१५ रुपये रोख व १२ लाख रुपये किमतीचा पिकअप असा एकूण २० लाख ५३ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आयुक्तांच्या आदेशांना धाब्यावर बसवणाऱ्यांवर कडक कारवाई करत आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या इतिहासातील गुटख्यावरची सर्वात मोठी आणि नववर्षातील उल्लेखनीय पोलिसी कामगिरी मानली जात आहे. संपूर्ण डीपी पथकाने अचूक सापळा रचून गुन्हेगारांवर कडक वचक ठेवत यशस्वी कारवाई केली.



