“आम्ही टाकळीकर’ राबविणार जलसंधारणाचा दुसरा टप्पा

Spread the love

“जलसंधारणा” त लोकसहभाग सर्वात महत्त्वाचा – सरपंच अरुणा खिलारी

अक्षराज : वसंत रांधवण
दि.२५, पारनेर (अहिल्यानगर) :
दिवसेंदिवस पाण्याची पातळी खोल जात आहे, याकरिता गावातील पाझर तलाव, ओढ्यांचे खोलीकरण करणे आवश्यक होते. यासाठी ग्रामपंचायतमार्फत व आम्ही टाकळीकर ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने राज्य शासनासह अनेक सामाजिक सामाजिक संस्थांना प्रस्ताव दिले होते. यांस मान्यता मिळाल्याने नाम फाऊंडेशन ग्रामपंचायतसह विविध संस्थांनी जलसंधारण कामास सुरुवात केली आहे.

या माध्यमातून पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे ही काळाची गरज असून जलव्यवस्थापन ही सरकारची जबाबदारी नसून लोकचळवळ बनली पाहिजे. टाकळी ढोकेश्वर येथिल दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी जलसंधारण, जलसंवर्धन, जलसंधारण सारखे उपक्रम राबवून भूजल पातळी वाढवण्यासाठी पुढाकार घ्यावा. जलसंधारणात लोक सहभाग सर्वात महत्त्वाचा आहे, लोकांनी या उपक्रमांमध्ये सहभाग नोंदविला पाहिजे असे प्रतिपादन सरपंच अरुणा खिलारी यांनी केले.
टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथे नाम फाऊंडेशन, ग्रामपंचायतसह विविध संस्थांच्या माध्यमातून आम्ही टाकळीकर ग्रामविकास प्रतिष्ठानच्या समन्वयाने जलसंधारण कामाच्या दुसऱ्या टप्प्याच्या शुभारंभ नुकताच सरपंच अरुणा खिलारी यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी आम्ही टाकळीकर ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव जेष्ठ पत्रकार चाॅंद शेख,उपसरपंच रामभाऊ तराळ, माजी सरपंच शिवाजी खिलारी, बाजार समितीचे माजी उपसभापती विलास झावरे, सावली प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ भाऊसाहेब खिलारी, सामाजिक कार्यकर्ते श्रावण गायकवाड, ग्राम. पं. सदस्य भाऊसाहेब खिलारी, पत्रकार शरदराव झावरे, दादा भालेकर, वसंत रांधवण संतोष सोनावळे, आदिनाथ पायमोडे, संकेत झावरे, शुभम गुंदेचा बाळासाहेब गायकवाड, मंगेश खिलारी, प्रताप खिलारी, अक्षय गोरडे, राहुल झावरे, राहुल झावरे, दिलीप झावरे,बबलू झावरे, जयसिंग झावरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
सरपंच अरुणा खिलारी म्हणाल्या, या योजनेअंतर्गत जलसंधारणाचा दुसऱ्या टप्प्यात गावातील पाझर तलाव, केटीवेअर, लोकउपयोग प्रकल्प,बंधाऱ्यातील गाळ काढून त्यांचे खोलीकरण करून संपूर्ण टाकळी गावातील परिसर हा पाणीदार केला जाणार आहे.

आम्ही टाकळीकर चळवळ क्रांती घडवेल

आम्ही टाकळीकर ग्रामविकास प्रतिष्ठान कृतीशील समूहाच्या माध्यमातून ग्रामविकासाची चळवळ सुरू असून आता यावर्षी जलसंधारणाचा दुसरा टप्पा मोहीम राबवली जात आहे. यामुळे गावातील पाण्याची पातळी वाढवून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. परिसरात शेतकरी व ग्रामस्थांच्या जीवनात ही जलसंधारण चळवळ नक्की क्रांती घडवेल, आम्ही टाकळीकर चळवळ
लोकाभिमुख असून समाजातील सर्व घटकांनी जलव्यवस्थापनासाठी सक्रिय सहभाग नोंदविणे गरजेचे आहे.

-डॉ. बाळासाहेब बांडे, अध्यक्ष आम्ही टाकळीकर ग्रामविकास प्रतिष्ठान, टाकळी ढोकेश्वर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!