Breaking
ब्रेकिंगराजकिय

निवृत्ती राजीनाम्याबाबत काय म्हणाले शरद पवार?

0 3 9 1 0 5

निवृत्ती राजीनाम्याबाबत काय म्हणाले शरद पवार?

अक्षराज : प्रतिनिधी

दि.०२, मुंबई : आज मंगळवार, दिनांक ०२ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शरद पवार यांनी राजीनामा दिला. शरद पवारांनी आपला राजीनामा मागे घ्यावा या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं. त्यानंतर अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि इतर ज्येष्ठ नेत्यांनी शरद पवारांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली आणि कार्यकर्त्यांच्या भावना त्यांच्या कानावर घातल्या. राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर पक्षाचे नेते अजित पवारांनी कार्यकर्त्यांना संदेश सांगितला. ते म्हणाले की, “आम्ही शरद पवार साहेबांसोबत बैठक घेतली आणि कार्यकर्त्यांच्या भावना त्यांच्या कानावर घातल्या.
त्यानंतर पवार साहेबांनी दोन-तीन दिवसात यावर विचार करतो असं सांगितलं. पण कार्यकर्ते उपाशी राहून आंदोलन करत आहेत हे त्यांच्या मनाला पटलं नाही. सगळ्या कार्यकर्त्यांनी घरी जावं असं त्यांनी सांगितलं. जर कार्यकर्त्यांनी इथेच थांबण्याचा हट्ट केला तर मात्र आपण निर्णय बदलणार नाही असं पवार साहेबांनी सांगितलं आहे.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे