केरा नदीत केला कचरा डेपो ; नाक मुठीत धरून पाटणमध्ये प्रवेश

Spread the love

अक्षराज : सुरेश संकपाळ
दि.२३, पाटण (सातारा) :
पाटण केरा पुलाजवळ केरा नदीत अक्षरशः कचरा डेपो केला आहे. त्यामुळे केरा पुलावरून ये जा करताना नागरिकांना नाक मुट्टीत धरून पाटणमध्ये प्रवेश करावा लागत आहे. पाटण नगरपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने चिकन मटण मासे निघालेली वेस्टेज घाण केरा,पुला शेजारी थेट केरा नदीमध्ये कचरा टाकल्यामुळे मोठी दुर्गंधी परिसरात पसरली आहे. या दुर्गंधीचा केरा पुलावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना व परिसरातील नागरिकांना मोठा आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. पाटण नगरपंचायतीच्या नाकर्तेपणामुळे हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे येथे कचरा टाकणाऱ्यांच्यावर कडक कारवाई केली तर कचरा टाकायचे कोणी धाडस करणार नाही. तर
पाटण शहरातून वाहणाऱ्या केरा नदीचे पात्र दिवसेंदिवस प्रदूषणाच्या विळख्यात सापडत असून, आता या नदीचे रूपांतर अक्षरशः कचरा डेपो झाली आहे, नदीपात्रात काही चिकन मटण व मासे दुकानांमधील टाकाऊ अवशेष, पिसे, आतडी तसेच इतर घाण सर्रास टाकली जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या दुर्गंधीमुळे नदीलगतच्या नागरिकांचे दैनंदिन जीवन त्रस्त झाले असून येथून ये-जा करताना नाक मुठीत धरावे लागत आहे. सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पाटण नगरपंचायतीकडून घाण टाकणाऱ्यांवर कसलीच कारवाई होताना दिसत नाही. स्वच्छ, सुंदर पाटण शहराचा नारा देणाऱ्या पाटण नगरपंचायत प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

पाटण शहरातील काही मांस विक्रेते आणि असामाजिक प्रवृत्तीचे लोक नियमांचे उल्लंन करत रात्रीच्या वेळी किंवा पहाटे नदीपात्रात चिकन मटणचा व माशाचा कचरा टाकत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. या कचऱ्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात घाण साचून राहते. हा कचरा कुजत असल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे नागरिकांना नाक दाबून प्रवास करावा लागत आहे.
या घाणीमुळे माशा, डास, उंदिर आणि भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. कचऱ्यावर ताव मारण्यासाठी कुत्र्यांचे कळप नदीपात्रात फिरत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. हा सर्व कचरा वाहून जाऊन पाण्याचे प्रदूषण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीतील जलचरांवरही परिणाम होऊ शकतो, अशी भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. केरा नदी ही शहराच्या पर्यावरणाचा महत्त्वाचा भाग असताना तिची होत असलेली दुर्दशा चिंताजनक आहे. नदी स्वच्छ ठेवण्यासाठी वेळोवेळी विविध अभियान राबविण्यात येतात, मात्र नदीपात्रात कचरा टाकणाऱ्यांवर प्रभावी कारवाई होत नसल्याने ही मोहीम केवळ कागदोपत्रीच राहिल्याचे दिसून येत आहे.

“पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार नदी, नाले किंवा सार्वजनिक ठिकाणी जैविक कचरा टाकणे हा गंभीर प्रकार मानला जातो. असे असतानाही संबंधित विभागाकडून प्रभावी देखरेख होत नसल्याने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे धाडस वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.”

“केरा नदीचे वाढते प्रदूषण ही केवळ स्वच्छतेची समस्या नसून पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याशी निगडित गंभीर बाब आहे. प्रशासनाने वेळीच कठोर पावले उचलली नाहीत तर नदीचे अस्तित्व आणि परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!