१६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, मोटार सायकल असा २४,३०,०००/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
अक्षराज : प्रमोद दिवेकर
दि.०७,शिक्रापूर (पुणे) : शिक्रापूर, शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत घरफोड चोरी करणारा सराईत आरोपी दिपक भिमराव दांडगे हा स्थानिक गुन्हे शाखा व शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार यांना मौजे कविटा ता. अचलपूर जि. अमरावती येथे त्याच्या बहिणीकडे रहात असल्याची खात्रीशीर बातमी गोपनीय विभागाकडून मिळताच त्याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीस चौकशी केली असता त्यानी शिक्रापूर, शिरूर परिसरात चोरी केल्याचे कबूल केले. आरोपी दिपक भिमराव दांडगे वय 25वर्षे रा. घुग्री ता.भैसदेही जि.बैंतुल यावर यावर शिक्रापुर पो स्टे. गु.र.नं. ६६९/२०२६, भा.न्या.सं.क. ३३१ (३), ३०५ (ए), २) शिक्रापुर पो स्टे. गु.र.नं. ६७०/२०२६, भा.न्या.सं.क. ३३१(३), ३०५ (ए), व ३) शिरुर पो स्टे गु.र.नं. ७०८/२०२६ भा.न्या.सं.क. ३३१ (३), ३०५ (ए), प्रमाणे गुन्हे दाखल असल्याचे कबुल केले असुन पुढील तपास कामी शिक्रापूर पोलीस स्टेशनकडील गु.र.नं. ६६९/२०२६ मध्ये अटक करण्यात आली आहे.
सदर गुन्हयाच्या तपासामध्ये आरोपीकडुन चोरीकेलेले सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलेले असुन आरोपी कडुन सुमारे १६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व मोटार सायकल असा एकुण २४,३०,०००/- रू. किं. चे हस्तगत करण्यात आले आहे. सदर सराईत आरोपी विरुध्द यापुर्वी महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्यांमध्ये एकुण १४ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपीस मा. न्यायालयात हजर करणेत आले असुन आरोपी सध्या शिक्रापुर पोलीस कोठडी रिमांड मध्ये आहेत.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, साो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, पुणे विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. रविंद्र भासले, शिरूर उपविभाग, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, श्री. प्रमोद क्षीरसागर, स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक, चंद्रशेखर यादव, शिक्रापुर पोलीस स्टेशन, सपोनि राहुल देशमुख, शिक्रापुर पोलीस स्टेशन व स्था.गु.शा.चे पोसई महेश डोंगरे, सफौ/संजय पड्याळ, पोहवा/तुषार पंदारे, पोहवा/जनार्दन शेळके, पोहवा/संजू जाधव, पोहवा/राजु मोमीन, पोहवा/विकास पाटील, पोकों/सागर धुमाळ व शिक्रापुर पो स्टे कडील पोसई उमाकांत कुंजीर, पोलीस अंमलदार सहा फौजदार धनंजय थेऊरकर, पोहवा/अमोल दांडगे, पोहवा/शिवाजी चितारे, पोहवा/रोहिदास पारखे, पोहवा/अमोल नलगे, पोकों/मच्छिद्र निचित, पोकों/नारायण वाळके, पोकों/राम जाधव, पोकों/भारत भोसले पोअंल/अस्मिता जोंधळे यांनी केली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास शिक्रापुर पोलीस स्टेशन करत आहे.



