फरार आरोपीचा अखेर छडा; लक्ष्मीनगर पोलिसांना यश !
अक्षराज : प्रणिल कुसाळे
दि.१४, येरवडा (पुणे) : येरवडा परिसरातील अपहरण व बलात्काराच्या आरोपांशी संबंधित प्रकरणातील फरार आरोपी सलमान युनूस शेख (वय ३२, मूळ रा. मालेगाव, नाशिक) याला लक्ष्मीनगर पोलिसांनी अखेर अटक केली. आरोपीचा शोध घेण्याच्या मागणीसाठी काही संघटनांनी काल संध्याकाळी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केले होते.

या पार्श्वभूमीवर लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची सूत्रे वेगाने हलवण्यात आली. तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याने या प्रकरणातील तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या कारवाईकडे परिसराचे लक्ष लागले होते. दरम्यान, आरोपीविरुद्ध दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सुरू सुरु आहे.



