पिटसई मुळगाव येर्थे विविध कार्यक्रमाचे आयोजन
अक्षराज : प्रतिनिधी
दि.१६, रायगड : सालाबाद प्रमाणे याही वर्षी नुकताच पिटसई मुळगाव, तळा. रायगड, येथे ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, मुंबईकर मंडळ तसेच कालिका माता क्रिकेट आणि नाच मंडळ यांच्या उपस्थिती मध्ये सार्वजनिक कार्यक्रम नुकतेच गाव पिटसई मुळगाव येथे कालिका माता प्रीमियर लीग (KPL) २०२६ पर्व ४ थे मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे नियोजन खालील प्रमाणे करण्यात आले होते.

सकाळी १०:३० वाजता सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १२ वाजता महाप्रसादीचे नियोजन, संध्याकाळी ४ वाजता महिला हळदी कुंकू, संध्याकाळी ७ वाजता ग्रामस्थ मंडळ तसेच मुंबईकर मंडळाचे सुस्वर भजन, रात्री ८:३० वाजता महाप्रसाद, रात्री १०:०० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम गॅदरिंग. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्र संचालय सुशांत ज्ञानेश्वर कातुर्डे यांनी केले.

पर्व ४ मध्ये ARP टायटन्स, पिटसई फायटर, स्मित 11, सुप्रित फायटर, सरयू 11 आणि LNS चॅम्पियन्स अशा टीम्स ने सहभाग नोंदवला होता. कालिका माता प्रीमियर ची सुरुवात राष्ट्रगीताने झाली, या वर्षीच्या KPL पर्व ४ ची विजेता टीम स्मिथ 11 आणि उपविजेता टीम सरयू 11 या दोन टीम ने बाजी मारली. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना सन्मानचिन्ह तसेच कालिका माता प्रीमियर लीग ( KPL ) २०२६ सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. दोन दिवसांचा कार्यक्रम वाखाण्याजोगे होते . त्या साठी लागणारी मेहनत सर्वानीच घेतली म्हणुनच हे कार्यक्रम आपण सर्व यशस्वी करू शकलो . गावातील सर्व सभासदांचे मी सचिव श्री. चंद्रकांत दा तांदळेकर सर्व ग्रामस्थांचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानले



