टाकळीढोकेश्वर येथे कांदाप्रश्नी रविंद्र राजदेव आक्रमक
नगर – कल्याण महामार्गावर छेडलं रास्ता रोको आंदोलन
अक्षराज : वसंत रांधवण
दि.१५, पारनेर (अहिल्यानगर) : नगर कल्याण महामार्गावर टाकळी ढोकेश्वर येथील महात्मा फुले चौकात आज अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली टाकळी ढोकेश्वर गटाचे खंबीर नेते निलेश लंके प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रवींद्र राजदेव यांच्या नेतृत्वाखाली कांदा प्रश्नी विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

कांद्यावरील निर्यात बंदी कायमची उठवावी, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे खराब झालेल्या कांद्याची नुकसान भरपाई प्रति किलो तीस रुपये बाजारभाव मिळावा, तसेच शेतकऱ्यांना कर्ज माफी, कांद्याला तात्काळ हमीभाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांनी रात्रंदिवस कष्ट करून पिकविलेल्या कांद्याला सध्या बाजारात अत्यंत कवडीमोल भावाने खरेदी करत आहेत. कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही,या मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आले.
रविंद्र राजदेव यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसोबत शुक्रवारी (दि.१५) टाकळी ढोकेश्वर येथिल महात्मा फुले चौकात ‘रास्ता रोको’ आंदोलन केले.
शेतकऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने कांदा साठवून ठेवला. मात्र बाजारभावात मोठी घसरण होत आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी या वेळी शासनाचा निषेध केला. ‘अपेक्षित दराअभावी कांदा उत्पादकांची अवस्था अतिशय बिकट झाल्याने हे आंदोलन करण्यात आले ’ असे शेतकऱ्यांनी सांगितले.
अखेर मागण्यांचे निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले..
आंदोलनावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दीपक आण्णा लंके, निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश भालेकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते मोहनराव रोकडे, सरपंच प्रकाश गाजरे, महिला नेत्या सोनिया राजदेव, उपसरपंच रामभाऊ तराळ, शशिकांत आंधळे, जालिंदर लंके, विक्रम काळे, विश्वास शेटे, सरपंच शिवाजी निमसे, सरपंच अभिजित झावरे,पोपट चौधरी, भानुदास आग्रे, बाळासाहेब चिकने, रामभाऊ थोरात, पोपट नरड, जयवंत वाळुंज, बाबासाहेब बांडे,यांनी मनोगत व्यक्त केले आहे. आंदोलनात टाकळी ढोकेश्वर गटातील शेकडो शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
“आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पारनेर पोलीसांनी टाकळी ढोकेश्वर येथिल महात्मा फुले चौक परिसरात पोलीसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. आंदोलकांशी प्रशासनाने चर्चा करण्याचा प्रयत्न केला; मात्र मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी कायम ठेवला. अखेर प्रशासनाने मागण्यांचे निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.”
“कांद्याला सध्या बाजारात अत्यंत कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. शेतकरी रात्रंदिवस कष्ट करून पिकविलेल्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नये. कांद्याला हमीभाव मिळाला पाहिजे, तसेच निर्यातबंदी पूर्णपणे हटवली पाहिजे. सरकारने वेळीच ठोस निर्णय घेतला नाही, तर आगामी काळात अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा निलेश लंके प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष,राष्ट्रवादीचे नेते रविंद्र राजदेव यांनी आंदोलनस्थळी दिला.”



