Breaking
ब्रेकिंगमुंबई व कोकण विभाग

नव्या कोऱ्या बाईकला धडक, एक ठार दोघे जखमी

0 3 9 0 9 6

धामटणे येथे बाईकला धडक, एक ठार दोघे जखमी

अक्षराज : निलेश कासट

दि.२८ डहाणू (पालघर) : डहाणू तालुक्यातील धामटणे- पेठ मुख्य रस्तावरील धामटणे पेठ हद्दीजवळ ट्रक ने बाईक स्वार यांना जोरदार धडक दिली. पेठकडून कासा येथे बाईक स्वार जात असताना धामटणे येथून माती ने भरून जाणाऱ्या ट्रकनी धडक दिली. बाईक स्वार यांच्या अंगावरून ट्रक गेल्याने आंबेदे येथील रुपेश बाबल्या सुर्वे या तरुण मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर नयन ठाकरे (आंबेदे ) व आकाश घरत (पेठ )हे जखमी झाले आहेत. जखमीना कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ट्रक चालक मात्र ट्रक जागीच सोडून पसार झाला असून ट्रक कासा पोलीस स्टेशन मध्ये जप्त करण्यात आला. पुढील तपास कासा पोलीस करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 9 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे