विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राथमिकता द्यावी ;  पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन

Spread the love

अक्षराज : वसंत वडस्कर

दि.०८, चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील स्कूल बस चालकाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्रथम प्राथमिकता द्यावी, अशी सूचना चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी केल्या. ते चंद्रपूर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीच्या बैठकीत बोलत होते. 

या बैठकीला प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, महानगर पालिकेचे उपायुक्त संदिप चिद्रवार, परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक स्मिता सुतवणे, वाहतुक पोलीस निरीक्षक प्रविण पाटील उपस्थित होते. स्कूल बस मालकाने सुट्टीच्या कालावधीमध्ये सर्व स्कूल बस वाहनांचे मेन्टनन्स करावे. फिटनेस मुदतीत असेल तरी वाहन तपासणीसाठी आरटीओ कार्यालयाकडे सादर करावे. त्यासाठी आरटीओ कार्यालयामध्ये तपासणी कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. प्रत्येक स्कूल बसला सीसीटीव्ही लावावेत. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पब्लिक ट्रान्सपोर्टने किती विद्यार्थी येतात, याबाबतची माहिती वाहतुक शाखा तसेच प्रादेशिक परिवहन विभागाकडे सादर करावी. वाहनांचे मेंटेनन्स नियमित करावे, वाहनांचे पार्किंग योग्य ठिकाणी करावे.

बस चालकाने मद्यपान करुन वाहन चालवू नये. आसन क्षमतेचे उल्लंघन करु नये. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी स्कूलबस नियमावलींचे काटेकोरपणे पालन करावे, मुलींची वाहतुक करणाऱ्या बसमध्ये महिला मदतनिस असणे बंधनकारक आहे. सर्व शाळांनी शालेय परिवहन समितीची स्थापना करुन विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या सुरक्षिततेची खात्री करावी. अनधिकृत अॅाटोमध्ये विद्यार्थ्यांची वाहतुक करु नये. विद्यार्थ्यांच्या सुरक्षाविषयक काही सूचना गोपनियरित्या घ्यावयाच्या असल्यास वाहतुक पोलीस निरीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस अधीक्षक यांना देण्याचेही मुमक्का यांनी सांगितले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!