छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बुलढाण्यात चर्चासत्र संपन्न
अक्षराज : प्रतिनिधी
दि.१६, बुलडाणा : धर्मवीर संभाजी राजेंचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी आजही त्याग आणि समर्पणाची साक्ष देत आहे. ९ वर्षात 120 लढाया लढून एकही लढाई न हरणारे मराठी साम्राज्याचे दुसरे छत्रपती म्हणून संभाजी राजे कर्तुत्वाने अजरामर झाले. असे मत बुलढाणा शिवप्रतिष्ठानचे संस्थापक राजेश हेलगे यांनी व्यक्त केले.
बुलढाणा शहरातील जांभरुण रोड स्थित स्थानिक महात्मा फुले सभागृहात संभाजी राजे यांच्या जयंती निमित्त चौदा में ला सायंकाळी आयोजित जयंती चर्चासत्रात ते बोलत होते. छत्रपती संभाजी महाराजांना सामूहिक माल्यार्पन करून अभिवादन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव, प्रबोधनकार अँड.सतीशचंद्र रोठे पाटील, विचारवंत नारायणराव भाकडे, सुभाष भागीले, माऊली विठ्ठल वाघ, ईतीहासकार विशाल राणे, गजानन कोरके, सुरेखाताई निकाळजे, कमलाकर व्यवहारे, जिजाबाई इंगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
उपस्थित सर्व मान्यवरांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर समयोचीत मनोगत व्यक्त केले. प्रमुख मान्यवरांसह गणेश पाटील, पुंजाजी गायकवाड, अतुल सोनुने, महेश तायडे, यांच्यासह आझाद हिंद शेतकरी संघटना, किसान ब्रिगेड, रमाई ब्रिगेड, ग्राम स्वराज्य समिती, राष्ट्रीय बजरंग दल आदी संघटनांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेत यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.



