४५ व्या कुमार राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सुरज हजारी ने पटकावला प्रथम क्रमांक

Spread the love

अक्षराज : विनोद वास्कर
दि. १६, कल्याण (ठाणे) :
नुकतीच ४५ वी कुमार राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा सन २०२४ -२५ पुणे येथे पार पडली. सौजन्य मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलन संघ पुणे, आयोजक पे पंकज सुरजदादा हरपुडे यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये नाऱ्हेण गावातील सुपुत्र.कु.सुरज भगवान हजारी यांनी पुणे येथे ४५ वी कुमार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.

४५ वजनी गटात त्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंचकोशीतील नागरिक त्याच्यावर अभिनंदन शुभेच्छाचा वर्षाव करत आहे. आई-वडिलांना, नातेवाईक मंडळींना आणि ग्रामस्थांना आनंद झाला आहे. सुरज हजारी यांनी आपल्या गावाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवला आहे. आई-वडिलांचं आणि गावाचं नाव काढलं आहे. सुरज हजारीने वडिलांचे नाव भगवान राम हजारी व आईचे नाव रंजना भगवान हजारी आणि त्याचे वस्ताद चे कुशल गजानन पाटील यांनी खूप मेहनत घेऊन पैलवान घडवला आहे.

गावात तालीम नाही, व्यायामशाळा नाही तरी त्याचे वस्ताद कुशल पाटील त्याला १५ किलोमीटर घेऊन देसाई गावात सराव करण्यासाठी दररोज घेऊन जायचे. देसाई गावातील वस्ताद शत्रूगन पाटील यांनी सुरज हजारी त्यांच्याकडून खूप मेहनत करून घ्यायचे. आज फल आपल्याला दिसत आहे. सुरेश हजारी चे वडील गरीब असल्यामुळे पाहिजेतसे खुराक त्याला मिळत नव्हते. तरी सुरज खूप मेहनत करून आज कुमार महाराष्ट्र केसरी झाला. कष्ट आणि चिकाटी आणि आई-वडिल वस्ताद यांचा आशीर्वाद मुळे सुरज हजारी कुमार महाराष्ट्र केसरी झाला. आज संपूर्ण ठाणे जिल्हा आणि गाव अभिमानाने. सुरज हजारी याचे कौतुक करत आहे.

काल गावातील ग्रामस्थांनी, पंचक्रोशीतील वस्ताद आणि कुस्ती पैलवानांनी आपापल्या पद्धतीने रक्कम देऊन मदत केली आहे. त्या सर्वांनी त्याचा सत्कार सुद्धा केला आहे. आई-वडिलांना गावातील ग्रामस्थांना खूप आनंद झाला आहे. पोरांनी आई-वडिलांचे आणि गावाचं नाव काढलं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवला आहे.

One thought on “४५ व्या कुमार राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सुरज हजारी ने पटकावला प्रथम क्रमांक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!