शिळ-दिवा रस्ता बनतोय मृत्यूचा सापळा; पारसिक बँकेसमोर डंपरने घेतला पालिका कर्मचाऱ्याचा जीव

Spread the love

पारसिक बँकेसमोर डंपरने घेतला पालिका कर्मचाऱ्याचा जीव !

अक्षराज : विनोद वास्कर
दि. २६, शिळफाटा (ठाणे) :
शिळ-दिवा रस्त्यावरील अपूर्ण कामे, अनधिकृत फेरीवाले आणि बेशिस्त पार्किंगमुळे सामान्यांचा प्रवास जीवघेणा बनला असून आज सकाळी त्यात एका निष्पापाचा बळी गेला आहे.

शिळफाटा जंक्शन येथील पारसिक बँकेसमोर आज सकाळी साडे दहाच्या सुमारास MH 04 JU 0876 क्रमांकाच्या भरधाव डंपरने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

मृताची ओळख नारायण वाघे अशी झाली असून ते ठाणे महानगरपालिकेच्या शिळफाटा स्मशानभूमीत कर्मचारी म्हणून कार्यरत होते.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन डंपर चालकाला ताब्यात घेतले असून वाहन जप्त केले आहे. पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून, अपूर्ण रस्त्यांची कामे कधी पूर्ण होणार? अवजड वाहनांवर निर्बंध कधी लागणार? असा सवाल नागरिक विचारत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!