अक्षराज मीडियाच्या पत्रकारास शिळफाट्याच्या भर चौकात मारहाण

Spread the love

अक्षराज मीडियाच्या पत्रकारास शिळफाट्याच्या भर चौकात मारहाण

अक्षराज : प्रतिनिधी 

दि.२८, दिवा (ठाणे) : शुक्रवार, दिनांक २८ मार्च २०२५ रोजी अक्षराज मीडियाचे कल्याण ग्रामीण विधानसभा पत्रकार विनोद वास्कर यांना दुपारच्या सुमारास  शिळफाट्याच्या भर चौकात राहुल काटे आणि जितू आलीमकर या गावगुंडानी मारहाण केली आहे. विनोद वास्कर यांना त्यांनतरउपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  

गावागावातील बातम्या प्रकाशित करत असल्याने मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी शिळ डायघर पोलीस ठाण्यावर धडक दिली आहे.पत्रकाराचा मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन तक्रार दाखल केली जाईल. अशी माहिती शिळ डायघर पोलिसांनी दिली. तसेच पोलिसांकडून आरोपींचा शोध देखील सुरू करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!