मोशी कचरा डेपो दुर्घटना ! तत्कालीन कार्यकारी अभियंता हरविंदर सिंग बंसल यांच्या चौकशीची मागणी

Spread the love

मोशी कचरा डेपो दुर्घटना : तत्कालीन कार्यकारी अभियंता हरविंदर सिंग बंसल यांच्या चौकशीची मागणी

अक्षराज : प्रतिनिधी
दि.२५, पिंपरी चिंचवड (पुणे) :
मोशी कचरा डेपो परिसरातील इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी तत्कालीन कार्यकारी अभियंता हरविंदर सिंग बंसल यांच्या भूमिकेची निष्पक्ष, सखोल व उच्चस्तरीय चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर तसेच प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड युवासेना शहर संघटक निलेश हाके यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निलेश हाके यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदर प्रकल्पाचे नियोजन, प्रशासकीय मान्यता, तांत्रिक अंमलबजावणी आणि बांधकाम हे तत्कालीन कार्यकारी अभियंता हरविंदर सिंग बंसल यांच्या कार्यकाळात झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे इमारतीचे स्ट्रक्चरल डिझाईन, बांधकामाचा दर्जा, कचरा डेपो परिसरातील भौगोलिक व तांत्रिक बाबी, संबंधित मंजुरी प्रक्रिया तसेच प्रकल्पाशी संबंधित सर्व अभिलेखांची निष्पक्ष तपासणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

तसेच, प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात पूर्ण झाल्याचे सांगितले जात असल्याने त्या कालावधीत घेण्यात आलेले प्रशासकीय व तांत्रिक निर्णय, देखरेख आणि जबाबदारी यांची स्वतंत्र चौकशी करून दुर्घटनेस कारणीभूत ठरलेल्या संबंधित व्यक्तींची जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशीही त्यांनी मागणी केली आहे.

यासोबतच, मोशी कचरा डेपो दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून प्रकल्पाशी संबंधित सर्व तांत्रिक, प्रशासकीय व आर्थिक बाबींची तपासणी करण्यात यावी. चौकशीत कोणताही अधिकारी किंवा संबंधित व्यक्ती दोषी आढळल्यास त्यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार तातडीने योग्य ती प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निलेश हाके यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!