अल्पवयीन दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू !
अक्षराज : प्रणिल कुसाळे
दि.१६, येरवडा (पुणे) :
येरवड्यातील गोल्फ क्लब रस्त्यावर मोटारीची धडक, भरधाव मोटारीच्या धडकेत अल्पवयीन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना येरवड्यातील गोल्फ क्लब रस्त्यावर घडली. अपघातात दुचाकीस्वार अल्पवयीनाबरोबर असलेली सहप्रवासी मैत्रीण जखमी झाली. अपघातानंतर पसार झालेल्या मोटार चालकाचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

अपघातात मृत्युमुखी पडलेला १४ वर्षीय मुलगा येरवड्यातील कामराजनगर भागातील आहे. दुचाकीस्वार अल्पवयीन आणि त्याची मैत्रीण सोमवारी दि. १४ दुपारी तीनच्या सुमारास येरवडा भागातील एका जलतरण तलावात पोहण्यासाठी निघाले होते. गोल्फ क्लब चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर भरधाव मोटारीने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. दोघांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान अली मोहम्मद शेख या मुलाचा मृत्यू झाला.